स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले. ...
‘घेऊ नको रे फाशी ,जग राहिल उपाशी’ ही घोषणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या जागर दिंडीतील प्रमुख घोषणा ठरली. विद्यार्थी व युवकांनी या घोषणेने शहर दणाणून सोडले. ...
कोणत्याही समारंभात हारतुर्यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. ...
साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. ...
ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून सादर करणार्या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...