मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल, समितीला कॅबिनेट दर्जा देण्यात येईल, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही, असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने तातडीने घेतले. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर एका १० वर्षांच्या चिमुरडीने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. तिचीच १४ वर्षांची बहीण राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंतच्या पायी मोर्चात सहभागी झाली होती. ...
आझाद मैदानावर बुधवारी सुरू असलेला मराठा बांधवांचा गजर दिवसभर सोशल मीडियावरही दिसून आला. फेसबुक, टिष्ट्वटर असो वा व्हॉट्सअॅप या सर्वच सोशल साइट्सवर सकाळपासूनच मोर्चाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ...
मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुण-तरुणींनी हातावर टॅटू तर काहींनी डोक्यावर फेटा बांधून घेतला होता. यासाठी खास औरंगाबाद, जालना, नाशिक येथून स्वयंप्रेरणेने आलेल्या मंडळींनी मोर्चेकऱ्यांच्या डोक्यांवर फेटा आणि हातावर मराठा गोंदवून दिले. ...
कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही. ...
मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. ...