मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठ्यांना आपल्या किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर आणि खंदकाजवळच मराठा मोर्चा येऊन थांबला. इंग्रजांनी 1739 साली बांधलेल्या या खंदकापर्यंत पोहोचायला मराठ्यांना 278 वर्षे लागली. ...
मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या दिवशीचं विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान भरुन काढण्यासाठी येत्या रविवारी (13 ऑगस्ट)सर्व मनपा शाळा सुरू राहणार आहेत. ...
सुनियोजित अशी ओळख निर्माण केलेल्या मराठा मोर्चासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध होती. मुंबईचे प्रवेशद्वार ते थेट आझाद मैदान या मार्गावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. परिणामी, शहर उपनगरांत मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाला. ...
मराठा आरक्षण हा माथाडी कामगारांसाठी जिव्हाळ्याचा विषय. १९८२ मध्ये आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी जीवनयात्रा संपविली. नेत्याचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार सदैव पाठपुरावा करत राहिले. ...
आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह ‘एक मराठा...लाख मराठा’ अशी गर्जना करत, राज्याच्या कानाकोपºयातून मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवारी मुंबईत मराठ्यांचा अक्षरश: जनसागर उसळला. आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढत उसळलेल्या या भगव्या लाटेमुळे मुंबापुरी काही का ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अत्यंत सकारात्मक आणि कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच, या संदर्भात मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल विशिष्ट कालमर्यादेत उच्च न्यायालयात सादर करण्याची विनंती आयोगाला केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र ...
गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी मुंबई काबीज करून गेला. मंगळवारपासून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे बुधवारी सकाळी ११ वाजता राणीबाग मैदानापासून मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात शि ...