मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाचा बळी गेल्याने या विरोधात खारेपाटण मराठा समाजाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्ग बंद करून निषेध करण्यात आला. ...
मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...