मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. Read More
या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. ...
सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ...
चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. ...
हंदवाडाजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजरसह भारताचे पाच जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिलेली मुलाखत! ...