मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) न्यूड आणि एस. दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी समर्थन क ...
आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला. ...
मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. ...
येत्या आठवड्यात सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तर समारोप सोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. ...
गोवा , बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर ... ...