मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
पणजी : विधानसभा मतदारसंघांतील विकासकामे आणि त्या कामांसाठी निधी देणे या विषयाबाबत सरकारने आमदारांमध्ये भेदभाव करू नये, अशी मागणी घेऊन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. ...
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज प्रकरणात तूर्त अटक करण्याचा इरादा नाही, परंतु जेव्हा अटक करण्याचा निर्णय होईल तेव्हा दोन दिवस अगोदर त्यांना त्याची माहिती देण्यात येईल, असे खाण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास थकाकडून (एसआ ...
गोव्याचा पर्यटन हंगाम ऐनभरात आलेला असताना आणि लाखो पर्यटक सध्या गोव्यात असताना ओखी वादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर आता जी स्थिती निर्माण केली आहे, तशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असे गोव्यातील शॅक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ...
एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत. ...
पणजी : नद्यांप्रश्नी जो कराराचा मसुदा आहे, त्याविषयीचे सादरीकरण येत्या 11 डिसेंबर रोजी सर्व आमदारांसमोर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. साळसारखी नदी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकर ...