मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Utpal Parrikar News : गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचवेळी गोवा भाजपत दाणादाण उडालीय. म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी बंड केलंय. भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पणजीतून ते अपक ...
Goa Assembly Election: गोव्याचे माजी मुख्यमंत्री Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar यांनी भाजपाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला असून, त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...
भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यामुळे अनेक भाजपविरोधी पक्षांनी भाजपवर टीका केलीय. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, तसं घडलं नाही ...
Goa Election 2022 : मनोहर पर्रीकर म्हणजे केवळ नाव नव्हे तर ते अजून देखील गोमंतकीयांचा श्वास आहेत अशा प्रकारचा अनुभव गेले काही दिवस गोव्याला येत आहे. ...