मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांच्या बेमुदत उपोषणाने दहा दिवस पूर्ण केले आहेत. गोव्याला पूर्णवेळ व सक्रिय मुख्यमंत्री मिळायला हवा अशी मागणी घेऊन घाटे यांनी उपोषण चालवले आहे. ...
मगो पक्षाने सत्तेत राहूनही भाजपाच्या दोन नेत्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास जी अपात्रता याचिका सादर केली आहे, त्यावर पहिली सुनावणी येत्या सोमवारी (26 नोव्हेंबर)होणार आहे. सत्ताधारी भाजपाचे बारीक लक्ष त्याकडे लागून आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे. ...
मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाही अशी माहिती मिळाली. ...