मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एम्समध्ये पर्रीकर यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. पर्रीकरांच्या आरोग्याची आताची स्थिती पूर्वीच्या तुलनेत योग्य आहे की नाही?, याचा अंदाज घेऊनच त्यांना ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना दोन माणसे हाताला धरून घेऊन येतात व घेऊन जातात ही स्थिती पाहावत नाही. पर्रीकर यांनी आता सन्मानाने खुर्ची सोडावी, असा सल्ला काँग्रेस पक्षाने दिला आहे. ...
गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीतील एम्स इस्पितळाला भेट देणार आहेत. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री गोव्याहून दिल्लीला रवाना होत आहेत. ...