मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ...
CoronaVirus News : सध्या कोरोनाचे संकट उभे असले तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करीत आहे, तर भाजपच्या मंडळींकडून राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. ...
शस्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील उद्योगांना संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे क्षमता आहेत. त्यावर विश्वास ठेवून त्यांचा विकास करायला हवा. ...