मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मनोहर पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
विधानसभेच्या विसजर्नाचा प्रश्न येत नाही आणि विसजर्न करण्यासारखी स्थितीही नाही, असे पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दोघा मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. ...
गोव्यातील भारतीय जनता पक्षाला घरातूनच सतत शालजोडे खावे लागत आहेत. असा जोड्याचा तडाखा रविवारी पुन्हा एकदा बसला. भाजपाचे कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी हा जोडा हाणला आहे. ...
मंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन त्या पक्षातून काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेले ट्रोजन डिमेलो हे गुरुवारी संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षात फेरप्रवेश करणार आहेत. ...