मालेगाव : जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत. आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही इतरांकडे काही मागू नये. आम्ही आपल्या स्वत:वर प्रेम करू शकलो तर ईश्वर आमच्यावर प्रेम करतील, असा संदेश शिवानीदीदी यांनी दिला. ...
मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ...
मालेगाव : कॅम्प रोडवर असलेल्या बंगल्याच्या बनावट चाव्या तयार करून पाच लाख २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या कमलनाथ श्रावण सूर्यवंशी (४५) रा.द्याने याला छावणी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. शंतनू जयंत पवार यांनी फिर्याद दिली. ...
श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...
चीन, आॅस्ट्रेलिया, इराण या देशात शिक्षणासाठी गेलेल्या मालेगाव शहरातील चौघांना कोणताही त्रास नाही; मात्र त्यांची १४ दिवस वैद्यकीय तपासणी केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त किशोर बोर्डे व आरोग्य अधिकारी सायका अ ...
मालेगाव : राज्यात मुंब्रा, शीव, कळवा या शहरांसोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवासाठी फ्रॅन्चाईजी देण्यात आली असून, महाराष्टÑ राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
मालेगाव येथील माजी नगरसेवक प्रा. रिजवानखान अमानुल्लाखान (५०) यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणाºया शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (२७) रा. अख्तराबाद, देवीचामळा, मूळ रा. अजमेरानगर, धुळे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ...