मालेगाव: शहरात कोरोनावर आरोग्य विभागाने नियंत्रण आणले असले तरी गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली असून महापालिका क्षेत्रात शहरात आज ४८ बाधित तर तालुक्यात ग्रामीण भागात त्याच्या निम्मे म्हणजे २५ बाधित उपचार घेत आहेत. ...
मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते. ...
मालेगाव: तालुक्यातील माणके येथे मागील भांडणाच्या वादातून घरात प्रवेश करून घर पेटवून दिल्याप्रकरणी सुरेश अशोक देवरे (रा. माणके) यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोयगाव : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर नीलेश आहेर यांच्या प्रभागातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त बनले असून, या भागातील प्रश्न सोडवून नागरी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
मालेगाव : शहरात खून, लूटमार, चोऱ्यामाऱ्या, गावठी कट्टे, तलवारी आढळून येत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या दाभाडी रस्त्यावरुन एका मंगल कार्यालयाजवळून ७ लाख ६५ हजार रूपये किंमतीची कार चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. ...
धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारीदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मालेगाव शहरात गेल्या वर्षभरात बेकायदेशीर पिस्तुलांसह तलवारी सापडण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मालेगावमध्ये पोलीस राज अस्तित्वात आहे की नाही, अशा प्रश्न निर्माण होतो ...
मालेगाव शहरातील रॉयल व स्टार हॉटेल परिसरातून २ हजार ७०० लिटर बायोडिझेलसदृश द्रव्य जप्त करण्यात आले. तालुका पोलीस व महसूल विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. ...