खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:23 PM2021-11-01T22:23:00+5:302021-11-01T22:23:49+5:30

मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले

Unveiling of equestrian statue of Khakurdit Chhatrapati | खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Next
ठळक मुद्देमालेगाव:पालकमंत्री छगन भुजबळ,कृषिमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती

मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले

मालेगावात तालुक्यातील खाकुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर कृषीमंत्री दादा भुसे , शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, शिवशाहीर विजय तनपुरे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे, सेनेचे तालुकाध्यक्ष संजय दुसाणे, सखाराम घोडके, उपमहापौर निलेश आहेर, दिनेश ठाकरे संदीप पवार, राजेंद्र भोसले, खाकूर्डीचे सरपंच जयराज ठाकरे आदी उपस्थित होते.
सायंकाळी शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नितीन बानगुडे यांनी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर आधारित विचार यावेळी मांडले,
कृषीमंत्री दादा भुसे हे म्हणाले की , महाराजांकडे असलेले हजारो गुणांपैकी एक गुण आपल्याकडे असला तरी आपले जीवन सार्थकी लागेल. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका ही शिकवण महाराजांनी आपल्याला दिली, संपूर्ण नाशिक जिल्हाला आनंद वाटेल असे स्मारक खाकुर्डी गावात साकारले गेले. यासाठी प्रयत्नशील असलेल्या दांनशुरांचे त्यांनीं कौतुक केले एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी २०० रूपये स्मारकासाठी दिले त्याचे भुसे यांनी आवर्जून उल्लेख केला खाकुर्डी गावात सूरू झालेले शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांचे अडीअडचणीच्या प्रश्न सुटण्यास मदत होईल असे भुसे यांनी सांगीतले.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे यांनी प्रास्ताविकात महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची यावेळी अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती, क्रेनच्या साहाय्याने भुसे तसेच समितीने अध्यक्ष ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले, दिवसभर खाकुर्डी गावात शिवशाही अवतरली होती. सावतावाडीच्या वर्णेश्वर सिध्देश्वर मंदिरापासून ते वडणेर गावातून खाकुर्डी गावापर्यंत महाराजांच्या वेशभूषेत रथावरून मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ चित्ते यांनी केले

Web Title: Unveiling of equestrian statue of Khakurdit Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.