Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
Maharashtrachi Hasyajatra Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले कलाकार निखिल बने, श्रमेश बेटकर आणि मंदार मांडवकर हे केवळ स्टेजवरच नाही, तर सोशल मीडियावरही आपल्या चाहत्यांना खळखळून हसवत असतात. नुकताच या ...
नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया. ...