Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Rahul Narvekar Reaction on Supreme Court Issue Notice: १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने बजावलेल्या नोटिसीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...