Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. ...
आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. ...
Mla Disqualification hearing: ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. - जेठमलानी ...
शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. ...
एकनाथ शिंदे यांना सुनिल प्रभू यांनी २२ जून २०२२ मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...