महाराष्ट्र राज्याचा २०१८चा अर्थसंकल्प शुक्रवारी ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६२ हजार ८४४ कोटी रुपायांचा होता. तर ४५११ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित धरण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पानंतर देशी-विदेशी मद्य महागत असतानाच दूधाची तपासणी करणाऱ्या संचावरील कर हटवण्यात आल्याने ते स्वस्त झाले होते. २०१९मध्ये निवडणुका अपेक्षित असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक अर्थसंकल्प होता, तसाच राज्याचाही अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी तरतुद करावी लागल्याने या आर्थिक वर्षात नेहमीच्या खर्चात कपात करावी लागली होती. या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी करायची झाल्यास किमान २० हजार कोटींची तरतुद करावी लागणार आहे. त्यामुळे वार्षिक योजनेचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा ४ लाख २५ हजार कोटीच्या जवळपास पोहचल्याचाही फटका वार्षिक योजनेसाठीच्या तरतुदीला बसू शकतो. Read More
ढीपाडवा म्हणजे नव वर्षारंभ! महाराष्ट्रात लोक घराच्या बाहेर बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुनिंबाची पाने, अंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून, त्यावर धातूचा तांब्या बसवून गुढी उभारतात आणि त्याची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात ...
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने कोकणातील सर्वच क्षेत्रांसाठी दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन, आरोग्य, रोजगार निर्मिती, ऐतिहासिक वास्तू, खार बंधारे, फलोत्पादनासह सांस्कृतिक क्षेत्रासाठी ...
सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच पाणबुडीद्वारे होणारे समुद्र पर्यटन जागतिक दर्जाचे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक आणि परिसरासाठी भारतातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्या ...
संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. ...
वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी सलग चौथा अर्थसंकल्प सादर करताना शेरोशायरी करत विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पोतडीत फारसे नावीन्यपूर्ण काहीच नसल्यामुळे सर्वांचीच निराशा झाली. ...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात ...