महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून समोर आलेल्या गमती जमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:36 AM2018-03-10T11:36:38+5:302018-03-10T11:36:47+5:30

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात अनेक गमतीदार बाबी मांडल्या. त्यापैकी निवडक काही येथे देत आहोत.

The budget of Maharashtra came to the conclusion that | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून समोर आलेल्या गमती जमती

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून समोर आलेल्या गमती जमती

googlenewsNext

सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात अनेक गमतीदार बाबी मांडल्या. त्यापैकी निवडक काही येथे देत आहोत.

  • ६०९ बसस्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी तरतूद आहे. एका बसस्थानकाच्या वाट्याला येतात ६५६८१ रुपये. एवढ्या रकमेत बांधकाम होणार?
  • मिहान विमानतळासाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद आहे. प्रकल्प आहे १४०० कोटींचा. या गतीने प्रकल्प पूर्ण व्हायला लागतील आणखी १४ वर्षे.
  • एक मेगावॅट सौर ऊर्जेसाठी गुंतवणूक लागते ४ कोटी. अर्थसंकल्पात सौर ऊर्जेचे लक्ष्य आहे ३०० मेगावॅट आणि तरतूद आहे ३७५ कोटी.
  • संत्रा शेतकऱ्यांना अनुदानासाठी १५ कोटीची तरतूद आहे. संत्रा लागवड क्षेत्र आहे १,५०,००० हेक्टर. दर हेक्टरला अनुदान येते १०० रु. म्हणजे एकरी ४० रुपये.
  • ओल्या कचऱ्यांवर प्रक्रिया होऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १३६ शहराची निवड. अनुदानाची रक्कम ५ कोटी म्हणजे शहरी ३,१२,५०० रुपये.
  • ६,००,००० मुलींना केळी आणि अंडी असा सकस आहार देण्यासाठी १५ कोटी. प्रत्येक मुलीच्या वाट्याला येतात २५ रुपये.
  • श्रीक्षेत्र रामटेकच्या विकासाचा प्रकल्प खर्च आहे १५० कोटी. तरतूद आहे २५ कोटी. प्रकल्प पूर्ण व्हायला लागणार सहा वर्षे.
  • अर्थमंत्र्यांनी खर्च मर्यादित करण्याचा प्रयत्न करीन असे सांगत महसुली ४४०० कोटीवरून जवळजवळ चारपट म्हणजे १५,३७५ कोटी ठेवली आहे.

Web Title: The budget of Maharashtra came to the conclusion that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.