Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे ...
रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना विचारला. ...
शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली. ...