मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना प्रत्येकाने सुरुवातीला महामानवांचे, थोरपुरुषांचे व आपापल्या नेत्यांचे स्मरण केले आणि त्यांना वंदन केले. ...
धर्मनिरपेक्षता हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सूत्र असणार आहे. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील मुल्यांना अनुसरून असेल. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारला महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ...
मुंबई- नागपुर या समृध्दी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. या दोन मोठी शहरे जोडण्याच्या या योजनेसाठी भूखंड अधिग्रहणाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. ...