पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. ...
मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. ...
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता मागील तिन वर्षापासून नानाविध प्रयत्न सुरु असताना आज सकाळच्या सुमारास खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत किमी 36/400 येथे दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ...