खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. ...
कर्नाटकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराने सव्वादोन महिन्यांनंतर परिपूर्ण सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांना आघाडीचे सरकार सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
दोन आठवड्यांपूर्वी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १४, सत्ताधारी जनता दलाचे (एस) नऊ आणि बहुजन समाज पक्ष व केपीजेपी यांच्या प्रत्येकी एक अशा २५ जणांना सामावून घेण्यात आले. ...