कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ...
निळवंडे धरणातून शिर्डी-कोपरगाव या २६० कोटी ३९ लाख रुपये खर्चाच्या संयुक्त वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलवर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. गौतम स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. ...
कोपरगाव शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी होणा-या आर्थिक खर्चास मंजुरी देण्याच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाल्याने गुरूवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. ...