मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे. ...
तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या बॉबीचा मृतदेह अखेर सुरादेवी शिवारातील कालव्यात आढळला. पतंग पकडण्यासाठी धावत गेलेला बॉबी कालव्यात पडला अन् बुडून मरण पावला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...
सदर उड्डाण पुलावर रविवारी दुपारी एक प्राध्यापक दुचाकीने जात असताना अचानक नायलॉन मांजा आडवा आला व त्यांनी अंगावर घातलेले जॅकेट कापत मांजा गळ्यापर्यंत पोहोचला. त्यांनी हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांच्या बोटाला काप बसला. ...
तेथे दुपारी काही मुले पतंग उडवत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, पतंग मिळवण्याच्या नादात धावताना वैभवने त्याची सायकल एका भिंतीलगत उभी करून ठेवली होती. सायंकाळपर्यंत ती तशीच राहिल्याने तेथील एका स्थानिकाने ती आपल्या घरात सुरक्षित ठेवली. ८ ड ...
पतंगाचा नाद एका मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. ...
नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत तर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने जीव जाण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महापालिकेने याच्या विक्री व खरेदीवर आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ...