हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो. Read More
आज झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्ण पदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावली. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव ...