Kerala assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता. ...
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...
मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली. ...
ममतांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळणार असल्याचे चित्र या चाचणीतून दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ची सत्ता येण्याची शक्यता आहे. ...
Former Congress leader PC Chacko joins NCP : केरळमधील मोठे नेते पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...