कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut Electricity Bill Row: कंगनाचे मनाली येथे घर आहे. तिला आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून तिला धक्का बसल्याचे तिने दाखविले होते. परंतू, हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने सांगितलेली वस्तुस्थिती वेगळी आहे. ...