येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ...
धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. ...
जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत. ...
दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली. ...
लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. ...
भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. ...