ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरची त्यांची हा पहिलाच नागपूर दौरा ठरला. ...