आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सोरेन यांची नियमित जामिनासाठीची याचिका फेटाळली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन कसा देता येईल, हे आधी न्यायालयाला सांगण्यास सांगितले. ...