गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत कुवेतवर एकूण ३०७ बॅलेस्टिक मिसाईल्स, २ क्रूझ मिसाईल्स आणि ६१६ ड्रोन्स डागण्यात आले आहेत. इराणने पश्चिम आशियातील अमेरिकन तळ आणि महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. ...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
व्हान्स यांनी असेही सांगितले की, भविष्यात पुन्हा अशा कारवाईची गरज टाळण्यासाठी अमेरिकी प्रशासन आपली मोहीम काही काळ सुरू ठेवेल. त्यांनी याला दीर्घकाळ चालणारे युद्ध टाळण्याच्या उद्देशाने आखलेली एक रणनीती म्हटले. ...