इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला आहे. विविध रेल्वे झोनच्या अंतर्गत विभागात सुरु असलेल्या बेस किचनमध्ये भोजन तयार करून ते शहरातील गरजुंना वितरीत करण्याची तयारी ‘आयआरसीटीसी’ने सुरु केली आहे. ...
आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यासंदर्भात, 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पूढील आदेश येत नाही, तोवर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग व्यवस्था बंद राहतील. ...