International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
International yoga day, Latest Marathi News
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत अनके ठिकाणी योगासने सादर केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी योग केला. तसेच, आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी सुद्धा योग केला. यावेळी मो ...
घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योग केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरी ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने व उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्रामस्थ सूर्यनमस्कार घालणार आहेत. ...
आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण ही सर्व आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहेत. ...