दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. ...
मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणाले. ...
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. ...
गलवान खोऱ्यातील नदीवर पूल बांधकाम सुरू असताना दोन सहकारी जवानांना पुरात वाहून जाण्यापासून वाचवताना महाराष्ट्राच्या या वीरपुत्राने हौतात्म्य पत्करले आहे. ...
चीनने गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. ...
भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीनने लडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे. ...