गलवानमधील तणाव निवळण्याचे संकेत? फॉरवर्ड पोस्टवरून चिनी सैनिक आणि वाहनांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 05:13 PM2020-06-25T17:13:11+5:302020-06-25T17:23:16+5:30

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते.

Signs of relieving tension in the Galvan? Withdrawal of Chinese troops and vehicles from the forward post | गलवानमधील तणाव निवळण्याचे संकेत? फॉरवर्ड पोस्टवरून चिनी सैनिक आणि वाहनांची माघार

गलवानमधील तणाव निवळण्याचे संकेत? फॉरवर्ड पोस्टवरून चिनी सैनिक आणि वाहनांची माघार

Next
ठळक मुद्देपूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झाली होती हिंसक झटापटया घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर झाली होती स्तरावरील चर्चा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. गेले काही दिवस येथील परिस्थितीविषयी चिंता वाढवणाऱ्या नवनव्या घडामोडी घडत असताना तणाव निवळण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अशी माहिती आज समोर आली आले. चीनने गलवान खोऱ्यातील फॉरवर्ड पोस्टवरून आपले सैनिक आणि वाहने हटवून मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार आज चीनने आपल्या काही सैनिक आणि वाहनांना मागे घेतले आहे.  दरम्यान, उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंमधून चीनने फॉरवर्ड पोस्टवरून माघार घेतली असल्याचे समोर आले होते.

पूर्व लडाखमध्येभारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४० सैनिक मारले गेले होते. मात्र चीनने या चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांचा आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.  

या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यात चिनी सैन्याच्या माघारीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. त्यानंतर चीनने सध्या असलेल्या ठिकाणावरून सैनिक मागे हटवले जातील, असे आश्वासन दिले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

Web Title: Signs of relieving tension in the Galvan? Withdrawal of Chinese troops and vehicles from the forward post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.