इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारांपेक्षा अधिक एकरावर पसरलेल्या या इज्तेमामध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. ...
मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला आज सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. ...
शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमासाठी रेल्वे प्रशासनाकडून गुलबर्गा -औरंगाबाद - गुलबर्गा आणि सीएसटी मुंबई - औरंगाबाद - सीएसटी मुंबई अशा दोन विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. ...