दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे. ...
प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...
मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ...