A crack was detected in tracks between Tilak Nagar and Kurla on harbour line | Mumbai Train Update: कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Train Update: कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. 

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. 

कुर्ला-टिळकनगर दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. मात्र हार्बर मार्गावरील या बिघाडामुळे अनेकांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे.

 


Web Title: A crack was detected in tracks between Tilak Nagar and Kurla on harbour line
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.