शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत. ...
शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले. ...
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे या विभागाचा आणखी विकास करणे गरजेचे आहे.या विभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ...
शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
पीजीच्या एक हजार जागेचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला आहे. सध्याची गरज लक्षात घेता या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथे व्यक्त केली. ...