गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
'गोकुळ' दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत. ...
जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. ...
केंद्र सरकारने दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार असल्याने इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती पूर्ववत १२ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली. ...
प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी त्यांच्या संस्था इमारत बांधकाम अनुदानात 'गोकुळ'ने दूध संकलनानुसार १० ते १५ हजार रुपयांची भरघोस वाढ केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. ...