नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता. ...
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याची पाणीसाठ्याची अद्यावत माहिती. ...
नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...