पणजीसाठी महापौर निवड येत्या दि. 14 किंवा 15 मार्च रोजी होणार आहे. महापालिकेतील काही अधिका:यांनी तसे स्पष्ट संकेत काही नगरसेवकांना दिले आहेत. महापौरपद व उपमहापौरपद मिळविण्यासाठी महापालिकेतील दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
गेल्या महिन्यात घडलेल्या महिला पोलीस शिपाई अर्सेला पार्सेकर मृत्यू प्रकरण गुन्हा अन्वेशन शाखेकडे सुपूर्द केले असले तरी त्यातील तपासात अजिबात प्रगती नाही. या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस उपनिरीक्षकास अटक व्हावी आणि त्याला निलंबित करावे, ...
सांताक्रुझ व सांतआंद्रे या दोन मतदारसंघांतील पंचायतींनी गेल्या महिन्यात ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन पीडीएला विरोध केला होता व तसे नगर नियोजन खात्यालाही कळवले होते. तरी देखील या खात्याचे मंत्री विजय सरदेसाई हे दिशाभुल विधाने करून लोकांची फसवणूक करत... ...
गोव्यातील खाण लिजांचा लिलावच व्हायला हवा, अशी स्पष्ट भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे. २00७ ते २0११ या कालावधीत बेकायदा खाण व्यवसायातून तब्बल १६४0 लाख मेट्रिक टन म्हणजेच त्यावेळच्या दरानुसार ९८,४00 कोटी रुपयांची लूट झालेली असून ही रक्कम सरकारने वसूल ...
शुक्रवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम राज्यातील विमान वाहतूक सेवेवर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रत दाबोळीला येणारी दोन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तीन विमानांना इतर राज्यांतील विमानतळावर उतरावे लागले. ...
गोवेकरांसाठी खूशखबर! वार्षिक ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या आशियाई यादीत गोव्याच्या आगोंद बीचला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन किमीचा लांबच लांब रुपेरी वाळूचा पट्टा, काठावर असलेले आकर्षक शॉक्स याचबरोबर हा किनारा कासव संवर्धनाचेही केंद्र असल्याने ...
खर्चासंबंधीच्या वित्तीय समितीची परवानगी न घेताच गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळाच्या मेरशी येथील न्यायालय इमारत प्रकल्पाच्या कंत्राट खर्चात ५१ कोटी रुपये अतिरिक्त वाढ करण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...