माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं. Read More
जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर गोदी कामगार, रेल्वे कर्मचारी, महापालिका, बेस्ट व एसटी कर्मचारी यांच्याबरोबरच मुंबईतील फेरीवाले, रसवंतीगृहे, गुमास्ते, चित्रपटगृहे व हॉटेलांतील कामगार, टॅक्सीचालक अशा सर्व कष्टकऱ्यांचे नेतृत्व के ...
जॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली. ...
जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले ह ...
नांदेडच्या डोंगराळ प्रदेशात फिरत असताना एका पत्रकाराचा फोन आला अन् आमचा जॉर्ज गेल्याची बातमी समजली. कामगारांचा लढा उभारणारा आणि कामगार जगणारा जॉर्ज गेल्याच कळताच त्यांच्या आठवणींनी कंठ दाटून आला. ...
कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ...
कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...