Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि भाविकांच्या गर्दीमध्ये कोल्हापुरात रविवारी साडेचारपर्यंत २५० ’ ‘बाप्पांना’ निरोप देण्यात आला. ...
सकाळी नऊ वाजल्यापासून भक्तीमय वातावरण आणि शांततेमध्ये सुरू असलेल्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशउत्सव मिरवणुकीत रविवारी सायंकाळी सातनंतर उत्साहाला भरते आले. डोळे दिपविणारा लेसर शो आणि लाईट शो, विविध लोकनृत्यांनी मिरवणूक रंगली. गणेशभक्त आणि कोल्हापूरक ...
सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती. ...
पुढे जाण्याच्या कारणावरून मिरवणुकीत जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टीस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी रविवारी ७ च्या सुमारास लाठीमार केला. त्यात या मंडळाचे तीन कार्यकर् ...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ...
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते. ...
संपूर्ण महाराष्ट्रभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. ...