Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. ...
नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. ...
लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना राज्यात विविध ठिकाणी रविवारी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये २० भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. ...
लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करून त्याला वाजतगाजत निरोप देत असताना विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची चौदा फुटी मूर्ती कलंडल्याची घटना चारकोपमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. ...
डीजे की पारंपरिक वाद्ये? या वादाला बगल देत मोठ्या थाटामाटात लाडक्या बाप्पाचे विसर्जन रविवारी दिवसभर पार पडले. या वेळी दीर्घकाळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी पार पाडले. ...
गणरायाचा अखंड जयघोष करत तमाम मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पाणावलेले डोळे आणि गहिवरल्या मनांची या वेळी चौपाटीवर दाटी झाली. ...
पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे सहापर्यंत विसर्जन सुरू होते. महापालिकेने ६६ टन निर्माल्य संकलित केले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली. ...