बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपतीपाठोपाठ ज्यांचे वेध लागतात त्या गौरी मंगळवारच्या आगमनासाठी शाही साज लेवून नटूनथटून तयार झाल्या आहेत. ठसठशीत दागिने, आकर्षक साड्या, फराळाचे पदार्थ आणि नैवेद्यासाठी भाज्या, मिष्टान्ने यांनी बाजार फुलून गेले आहेत ...
आज भाद्र्रपद शुक्ल अष्टमी, मंगळवार, चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच ‘ज्येष्ठा गौरी आवाहन’ आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. ...
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. ...
अनिरुद्ध पाटीलबोर्डी : मोदकांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतांना चिकूपासून मोदक बनविण्याचा नवा ट्रेंड बोर्डीत सुरू झाला आहे. येथील महेश चुरी यांनी ही संकल्पना मागील वर्षी प्रत्यक्षात आणली असून यंदा पालघरपासून ते थेट मुंबईची बाजारपेठही काबिज केली ...
कोटी कोटी रूप तुझे... या अभंगानुसार ३६ कोटी देवांमध्ये केवळ गणराज हे एकमेव दैवत आहे, ज्याची कित्येक नावे आणि कित्येक रूपे आहेत. त्यांच्या भक्ताला बाप्पा ज्या रूपात हवा आहे, तो त्या रूपात बाप्पाला घडवितो. ...
तीन दिवस चालणा-या महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये सजावटीला मोठे महत्स असते. परंतु यावर्षी जीएसटीमुळे महालक्ष्मीच्या मुखवट्यांसह विविध वस्तुंवर १२ ते १८ टक्क्याने दरवाढ झाली आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मेळे भरत असत. त्याला गणपतीचे मेळे म्हणण्यात येऊ लागले. या मेळ्यांमध्ये देशभक्तीपर पदांची रचना करुन म्हटली जात असे. प्रत्येक मंडळाची मेळ्याची पदे त्या मंडळांना ओळख मिळवून देत असे. ...