अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ...
संरक्षण मजुरांकरवी दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करणे, रोपांना पाणी टाकणे, झाडासभोवताल काटे कुंपण करणे, झाडांचे निंदण करणे आदी कामे करून घेण्यात आली. एकीकडे काम करत असताना दुसरीकडच्या झाडांवर दुर्लक्ष झाल्याने बहुतांश झाडे वाळली तर का ...
नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पें ...
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे. ...
राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर द्यावी, ...
बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजी ...
लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा-अंबागड गाव शिवारातील बावनथडी वितरिकेत ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या असलेल्या नर वाघाचा मृतदेह आढळला होता. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर या वाघाची शिकार झाल्याचे वक्तव्य ...