गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी ...
गेल्या एक महिण्यांपासून या परिसरात पावसाने जोर धरला आहे. शिवाय जलाशयही पूर्ण भरला असल्याने एक-दोन दिवसाआड प्रकल्पाचे दरवाजे खुले करावे लागत आहे. एक महिण्याआधीच प्रकल्पाने पाण्याची आपली सिमा ओलांडली. नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले होते. ...
कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील न्यायडोंगरी व परधाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे जमा करून व मदत फेरी काढून ६०,८७० रुपये जमा केले. सदर रकमेचा धनादेश तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...
१५ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० वाजताच्या सुमारास अंतरगाव येथे घडली. खुशाल बंडू करकाडे वाहुन गेलेल्या बालकाचे नाव आहे. सावली तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत अंतरगाव जवळील धोंडू बाबा आश्रम शाळा शेजारी एक नाला वाहतो. ...
जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले. साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली ...